|मैत्री कशी असावी ? मैत्री म्हणजे काय ? | What is friendship like? What is friendship? |

0

मैत्री कशी असावी ? मैत्री म्हणजे काय ?


 "मैत्री" म्हटले की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहू लागतात.  मैत्री या दोन शब्दात किती ताकद आहे आहे हे वेळ आल्यावरच कळते. 

मैत्री ही अशी गोष्ट आहे की,आपल्याला हवी हवी शी वाटणारी, आपल्याला नेहमी आपल्या बाजूने उभे राहणारे आणि कसे मी आहे ना कशला चिंता करते असे बोलणारं आठवते.  जशी काय आपल्या गेल्या जन्मीचे पुण्या होते म्हणून आपल्याला असे छान भेटले असे वाटू लागते. वेलप्रसंगी धाऊन येणार आणि आपली मदत करणारी किंवा करणार असे आठवते.



 दोन जिवामधे असणारा लळा, प्रेम, त्याग पटिंभा

 आणि  विश्वास असणार  म्हणजे मैत्री  होय . मैत्री चे नाते हे विश्वासवर अवलंबून असते. कदी गोड तर कधी आंबट ,रुसवा फुग्वा असणार हे नाते असते. या नात्यापुढे किती बोलले तर शब्द अपुरे पडतील. हो ना ? तुम्हाला पण तसे वाटते ना ? 


मैत्री कशी असावी 

मैत्री ही एकदम निस्वार्थ असावी .  प्रत्येकी आपल्याला  आपल्या बाजूने उभी राहणारी असावी. वेळ प्रसंगी मदतीला धाऊन येणारी अशी असावी आणि मदत करणारी,आपले काय चुकले असेल लगेच सांगणारी,आपण चुकीच्या मार्गाने जात असेल तर सरळ मार्गावर आणण्यासाठी धडपडणारी असावी आपल्या सोबतीला असणारी आणि मी आहे ना तुझ्या सोबत अशी म्हणारी असावी.


 जशी कृष्णा आणि सुदामा सारखी असावी. जशी त्यांच्या नात्यात ओढ होती तशी मैत्रीच्या नात्यात पण ओढ असते. आपण म्हणतो मैत्री अशी असावी अशी असू नये. जगात भारी नातं म्हणजे मैत्रीचा. आपल्या बाजूने उभा राहणारा असा असावा असं वाटते. कृष्णा  हा राजा होता. आणि सुदामा हा  गरीब कुटुंबामध्ये उदरनिर्वाह करत होता परंतु,त्याने कधीच आपल्या मित्राला सांगितले नाही. सुदामा ला कश्यचे  मोह नव्हता.


एक मित्र असा करा की जेणेकरून तो तुमच्या वेळेला प्रसंगीला धावून येईल आणि तुमची मदत होईल. मैत्री म्हणले की एकमेकांना लागलेला लला होय. मैत्रीला ना कसल्या वयाच्या बंधन असताना कसल्या मर्यादा असतात. अगदी लहानपणापासून ते वयस्कर माणसापर्यंत आपण कोणाशीही मैत्री करू शकतो. त्याला कसलच बंधन नसतं. मैत्री ही पटकन होऊन जाते, पण खरी गरज आहे ती टिकवायची. माणसं येतात जातात भेटतात.  आणि आपण खूप माणसे जोडतो,जोडत मैत्री निर्माण होते.पण आजकाल मैत्री ही टिकत नाही. खरा मित्र कसा असावा हे आपण जाणलं

 पण कसा मित्र नसू नये हे आपण पाहणार आहोत मित्र हा आपल्या मित्राची काळजी करणार असावा. मैत्री ही वर वरची  नसावी मनात एक तोंडात एक. आपल्या मित्राबद्दल बोलले तर ते आपल्याला आवडत नाही.  तो मित्र  खरा  असतो. विश्वास हा मैत्रीचा कणा असतो.


काही लोक मैत्रीच्या नावाने लुबाडतात किंवा वाईट वाईट संगतीला लावतात असे मित्र कधीच असू नये आणि तुमचं पण नुकसान होतं आणि त्या मित्राचं पण नुकसान होतं "आपली यारी जगात लय भारी" असे बोलून एखाद्याचा विश्वास घात करू नये किवा फसऊ नये. किंवा मैत्रीचे नये पटकन तोडू नये,छोट्या छोट्या गोष्टीवरून.

आपण थ्री इडियट सिनेमाबद्दल पाहिले की मैत्री ते तीन मित्र एकमेकांची साथ कधी सोडत नाही असे ते तिघे मित्र असतात.तसेच आपले खरे मित्र  असायला पाहिजे. आणि ते कधीच एक आपली साथ सोडत नाही.


" मैत्री कशी असते? मैत्री म्हणजे काय ? काय वाख्या असतात ???

असे बरेच मित्र आहेत की, त्याने आपली मैत्री ही कायम टिकवली, निभावली आहे. मैत्री म्हटली की, ओलावा
मैत्री म्हटले की सर्वस्व.

मैत्रीत जसे आपण विचारांची देवाण घेवाण करतो तसे आपण कपडे, वस्तू आणि बरीच काही गोष्टी पण शेअर करतो.एकमेव हक्कचे ठिकाण म्हणजे मैत्री जिथे आपण सगळ काही शेअर करतो.

आणि शेअर केल्यानंतर आपण रिलॅक्स असतो अपल्यवरचे ताण कमी झालेला असतो.पक्की खात्री असते की माझा  friend माझी कुठे ही वाच्यता करणार नाही. तो खरा मित्र असतो.


Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)