नवरा बायकोच्या नात्यात कोणत्या ४ गोष्टी असू नये .
त्याचे ओझे निर्माण होत राहते नात्यावर.ते कोणतेही असो तसेच नवरा बायकोचे नाते आहे.जरी ३६ चे ३६ गुण जमले तरी त्यांचे पटेल असे नाही होत. त्याच्या उलटे होते.पत्रिका जमली पाहिजे गुण मिळाले पाहिजे .असे आपण कांदापोहे कार्यक्रमानंतर पत्रिका बागण्यचा नेम असतो .पत्रिकेत समजते की किती गुण जमले,काय मनुष्य गण आहे का ?? राक्षस गण, नाडी कोणती आहे का कोणती शांती केली पाहिजे असे बरेच प्रकार आपण करत असतो.
त्या सगळ्याचा एक च अर्थ असतो पत्रिका जमली की यंदा कर्तव्य करायला मोकळे असे म्हणतो .या सगळ्यांचा फरक पडतो का?? नवरा बायकोचे मन जुळले पाहिजे .
समजून घेतले पाहिजे असं आपण म्हणतो पण तसे होते का?? कधी होते तर कधी होत नाही. नवरा बायको चे छोट्या छोट्या गोष्टीमुळे खूप जोर चे भांडण होते .ते भांडण एवढ्यावर च थांबत नाही तर ते कोर्ट कचेरी परत जाते आणि होत्याचे नव्हते होऊन बसते. चला तर जाणून घेऊया .
![]() |
नवरा बायकोचे नात्यात कोणत्या ४ गोष्टी असू नये-ती आणि तिचे अस्तित्व |
समजून घेतले पाहिजे असं आपण म्हणतो पण तसे होते का?? कधी होते तर कधी होत नाही. नवरा बायको चे छोट्या छोट्या गोष्टीमुळे खूप जोर चे भांडण होते .ते भांडण एवढ्यावर च थांबत नाही तर ते कोर्ट कचेरी परत जाते आणि होत्याचे नव्हते होऊन बसते. चला तर जाणून घेऊया .
सतत अपेक्षा ठेवणे
सतत अपेक्षा ठेवणे ही खुप मोठी चूक असू शकते.कारण बायको म्हणते की, मला फोन केले पाहिजे.मला माझ्या मेसेज रिप्लाय दिला पाहिजे, मला माझ्या मनातले त्याल समजले पाहिजे,त्याने मल फिऱ्यलां नेले पाहिजे,हॉटेल मधे नेले पाहिजे, मला शॉपिंग ला नेले पाहिजे, खूप साऱ्या अपेक्षा करत असते.तर नवरा म्हणतो की बायकोने सकाळी लवकर उठावे, घरची सगळी कामे करावी, मुलांचे आई बाबा चे सगळी सोय तिने करावी, मला वेळ द्यावा, मी म्हणेल ती ते सगळे काम तिने करावे,तिनेच मला फोन केले पाहिजे.
तिने हाच ड्रेस घातला पाहिजे ,तिने मला वेळेवर जेवण दिले पाहिजे ,अशी अपेक्षा असते.परंतु अश्या या साऱ्या अपेक्षांचा ओझे घेऊन नवरा बायको जगत असतात.पण अपेक्षा पुर न झाले की मग भांडणाला सुरुवात होते. म्हणून नवरा बायोकोनी एकमेकांशी अपेक्षा न ठेवणे हे उत्तम आहे .जेणेकरून आपला संसार वाचेल.आणि एकमेकांना समजून घेणे महत्वाचे आहे. बरोबर आहे आपण नवऱ्याकडून अपेक्षा ठेवणार अजून कोणाकडून ठेवणार ? परंतु आग्रह करू नये.नवरा आणि बायकोने आत्मपरीक्षण केले पाहिजे की आपण अनावश्यक अपेक्षा तर करत नाही ना??
तुझी चूक आणि माझे बरोबर आहे
नवरा बायको मधे भांडण झाले की सुरू असते.तिचे चुकले आहे आणि मी बरोबर आहे .असे दोघे ही बोलत असतात.दोघेही असे बोलायला लागले तर संसार कसा सुरु होणार? नवरा म्हणतो मी बरोबर आहे तर बायको म्हणते मी बरोबर आहे .असे चालू झाल्यास कसे काय होणार दोगमदला अहंकार एवढा वाढले की, मी का कमी पण घेऊ तू नमते घे असे चालू असते.त्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. म्हणून संसार दोघाचा आहे तर एकमेकांनी तडजोड करून नमते घेतले पाहिजे.
एकमेकांची काळजी न घेणे
एकमेकांची काळजी न घेणे हे एक खूप मोठी समस्या आहे. नवरा म्हणतो की बायको घरतच असते तिला काय झाले काळजी घ्यायला त्यामुळे बायकोचे पण मन विचलित होऊन ती पण म्हणते की नवरा माझी काळजी घेत नाही विचारत नाही, मग मी का विचारू मग मी का त्याची काळजी घेऊ.असे झाल्याने दोघांच्या नात्यात दुरावा येऊन भांडणे ला सुरुवात होते. एकमेकांबद्दल काळजी नसते दोघंना तेव्हा तुमच्यात आदर नसतो.तुम्हालाच पूर्ण आयुष्य काढयचे आहे.एकमेकांनी दोघांच्या इच्छा ,अकांश्या याचा जीवनात काय अचिव करायचे याचा विचार केला पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमच्या चुकांना महत्व देता तेव्हा तुमच्या जोडीदाराच्या इच्छा आणि त्यांना महत्व द्या.आणि मग त्याचा परिणाम यांच्या संसार रा वर होतो. आयुष्यात दोघांना पण गरज लागणार आहे. आजारपणं ,म्हातारपण आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत जेणे करून तुम्हाला गरज भासू शकते.
विश्वासघात
नवरा आणि बायको मधील महत्वाचे धागा म्हणजे विश्वास होय.परंतु दोघे नवराबायको एकमेकांशी प्रामाणिक राहणे खूप महत्वाचे आहे.जर यांच्या नात्यात जी सत्यता नसेल तर ते नाते जास्त वेळ टिकत नाही.आणि त्याच्या परिणाम हा दोघांच्या कुटुंबात होऊ शकते.जर मुले असतील तर खूप भंयकर परिणाम होतो.त्यापेक्षा एकमेकांनी समजून घेऊन वेगळे राहलेले बरे वाटते.आणि असा किचकट घोळ होऊन बसतो. जर नवरा किंवा बायकोचे बाहेर संबंध चालू असले की तांच्या नात्या चे असेल की नसले त्याचा काही फरक पडत नाही.संशय हे विषारखे काम करते.म्हणून दोघांनी यांच्या नाताचा आदर केला पाहिजे .महत्वाचे आहे सवांद असला पाहिजे.आजकाल सरास अफेयर चालू आहे.त्यामुळे त्यांच्या नात्यावर फरक पडतो.आणि विश्वासघात होतो. नात्यात कधी हि विश्वास घात करू नयेते मग कोणतेही नाते असते.विश्वास हा आत्मा असतो सगळ्यांचा.
कसा वाटला लेख तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि अजुन काही राहिले असेल ते पण सांगा. तुम्हला आणखी लेख वाच्यायचे असतील हे पावसाळा | rainy season नक्की वाचा .
धन्यवाद!
Don't spam comment