मकरसंक्रांत १५ जानेवारी २०२४
ती आणि तिचे अस्तित्व
मकरसंक्रांत १५ जानेवारी २०२४ ती आणि तिचे अस्तित्व |
प्रत्येक वर्षी मकर संक्रात 14 जानेवारीला येते. पण यावर्षी मकर संक्रात ही 15 जानेवारीला आलेली आहे.
हा सण हिवाळ्यात येतो. त्यामुळे थंडीचे वातावरण सगळीकडे असते. या महिन्यात भोगी ,मकर संक्रात, किक्रांत असे तीन दिवस हा सण असतो.
सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असल्याने या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते म्हणून त्याला उत्तरायन म्हणतात. भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी वर तील घालून केली जाते. आणि सात प्रकारच्या म्हणजे जेवढ्या भाज्या आपल्याला भेटतील तेवढ्या प्रकारच्या भाज्यांची मिक्स भाजी केली जाते.
हिवाळा ऋतू असल्याने सगळीकडे धुके दाट पसरलेले असते. आणि या हिवाळ्यात गहू,बाजरी, ऊस ,बोराच्या पिकांचा ऋतू असतो. आणि अशा धान्यांचा त्यादिवशी वापर केला जातो.
सुगड कसे पूजन करायचे
मकर संक्रातीलाते सुगड पूजन केले जाते . कसे करायचे ते आपण पाहूया. हा सन खास करून सुहासिनी बायकांचा असतो .
प्रथम बाजारातून पाच मातीच्या मडक्या आणायचे त्याला त्या सगळ्यांना हळदीकुंकू लावून, शेंगा ,घेवडा , ऊस घालून पूजा केली जाते .
सुवासिनी या दिवशी सुगड पूजन करून सूर्या देवाला पूजा केली जाते. सुगड पूजन करून सुसिनीचे वान असते म्हणून त्या दिवशी ते वान झाकून ठेवले जातात. सुहासिनी मंदिरात जाऊन एकमेकींना हळदीकुंकू लावून वान दिला जातो.
आणि देवीला वाण देऊन किवा पाच सुहासिनी ना पण वाण दिले जाते.अश्या प्रकारे मकर संक्रांतीचे सन साजरा केला जातो.
त्या दिवशी तिळाचे लाडू , शेंगदाण्याची चिक्की मुर्म्र्याचे लाडू केले जाते.
संक्रातीच्या दिवशी तीळ आणि गुळ वाटून आपला सणांचा आनंद व्यक्त केला जातो . एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे बोलून एकमेकांना एकमेकांना दिले जाते .
जो काय आपल्या आयुष्यामध्ये कडवटपणा आला आलेला आहे .तो निघून जावा म्हणून एकत्र यावं म्हणून म्हणून पुढील शुभेच्छा दिल्या जातात. काही निगेटिव्हिटी असते एकमेकांच्या बद्दल ती घालून गुण्यागोविंदाने एकत्र येऊन नांदावी म्हणून हा सण साजरा केला जातो.
या दिवशी लहान मुले मुली पतंग उडवून आपला आनंद व्यक्त करतात.
नवीन जोडपे
संक्रात हा सण नवीन नवीन लग्न झालेल्या जोडप्यांची सुद्धा पण केली जाते. जसे की काळे साडी, काळी वस्त्र हलव्याचे दागिने, घालून हळदीकुंकू चा कार्यक्रम केला जातो. आणि आपल्या संसारात तिळागुळ प्रमाणे गोडवा या साठी कोणाला म्हणून संक्रातीचे सण साजरा करतात.
बोरनाणं
बोरनाणं मकर संक्रातीपासून ते रथ सत्तेपर्यंत केले जाते . शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे बोरनाणं केले जातात. केले जातात बोर नाणं केल्याने बाळाच्या दीर्घायुष्यासाठी केला जाणारा अघोळ आहे.
बाळाला काळे वस्त्र घालून हलवायचे दागिने, घालून मुरमुरे ,चॉकलेट, ऊस ,आणि बिस्कीट ला याने बाळाच्या डोक्यावरून पाच ते सात वेळा अंघोळ घातले जाते.
बाकीचे लहान मुले मुली बाळाच्या बोर्नाणं करताना जे काही डोक्यावरून पडत असते ते गोळा करत असतात. कोण काय गोळा करतो ,कोणी चॉकलेट ,कोणी बिस्कीट असा गोळा करत आनंद व्यक्त करत आणि आनंद लुटत असतात .
अश्या प्रकारे लुटण्याचा कार्यक्रम म्हणजे बोरनाणं होय .
अशाप्रकारे हिंदू संस्कृतीत मकर संक्रातीचा सन साजरा केला जातो. तुम्हाला कसा वाटला लेख नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आमच्या अजून काही लेख वाचायचे असेल तर बालपण पाऊस यावर क्लिक करा
धन्यवाद!
Don't spam comment