|नवरा आणि बायको मध्ये या ७ गोष्टी असायला हवे | A husband and wife should have these 7 things|

0

नवरा आणि बायको मध्ये या ७ गोष्टी असायला हवे | A husband and wife should have these 7 things

नवरा बायको 


नवरा आणि बायको  मध्ये या ७ गोष्टी असयला हवे . नवरा आणि बायकोची ची गाठ ही स्वर्गातच बांधली जाते,असे म्हणतात. नवरा हा बायकोविना अपूर्ण आहे. जरी आपल्या समाजामध्ये पुरुषप्रधान संस्कृती असली तरी, दोघांना संसार करायचा असतो.जेवढे स्थान पुरुषाला आहे तेवढेच स्त्री ला आहे. नवरा बायकोचे नाते हे पवित्र आहे. नवरा आणि बायकोचे नाते मैत्रीचे  नाते असले पाहिजे.दोघांचे नाते हे आवडीचे प्रेमाचे असले पाहिजे.आपण आजकालच्या युगात बरेच गोष्टी ऐकतो,बगतो कि, भांडण झाले,विश्वास कमी  घटस्फोट झाले तर असे होऊ नये म्ह्नुन जाणून घेऊया बायकोचे नाते निभावताना  कोणत्या  ७ गोष्टीची गरज असायला  पाहिजे .तर या ७ गोष्टी कोणत्या आहेत. चला तर बगूया.


नवरा आणि बायको मध्ये या ७ गोष्टी असायला हवे  _ती आणि तिचे अस्तित्व

विचार 
 आपला संसार सुखाचा व्हावा असे प्रत्येक नवरा बायकोला वाटत असते.आणि करण्यासाठी अगदी एकमेकांचे विचार जुळायाल पाहिजे आपण असे म्हणतो. अगदी विचार नाही जुळले तरी दोन व्यक्तीचे मन जुळले पाहिजे. कारण प्रेम वाढयाला सुरुवात होते. आणि तिथ पासून सुरुवात होते नवीन आयुष्याला आणि कोणी च परफेक्ट नसतो. दोघांचे विचार भिन्न असू शकतात.

सवांद करणे आणि वेळ देणं 
 कोणतीही व्यक्ती असू दे संवादअसला पाहिजे.कारण आपण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आपले प्रोब्लेम सुटत नाही.किती गडबड, घाई बिझी असूद्या रोज आपल्या बायकोशी प्रेमाने चार शब्द बोलले तर संसार चांगला होतो. जर काम च व्याप आणि मुले आणि काम टेन्शन मधे आपण एकमेकांशी बोलत च नाही. त्यामुळे आपल्या नात्यात दुरावा येऊ शकतो.आजच्या धावपळीच्या युगात कमाचा व्यापामुळे अजिबात नवरा आणि बायको मधे बोलणे होत नाही. 
तुमच्या आयुष्यतील दिवसभराचे जे काही काम असते .ते आपण एकमेकांना शेअर केले पाहिजे. आणि आपल्या बायकोपसून किवा नवरया पासून कोणतीच गोष्ट लपवता काम नये.अगदी लहानहांतील लहान गोष्ट सुद्धा. असे काही नवरे असतात की, काम पुरते बोलतात तर काही नवरे प्रतेक गोष्ट आपल्या बायकोला सांगतात असे नवरे १०० तर १,% टक्का असते. काही नवरे असे असतात कि सगळे निर्णय स्वतच घेतात . बायकोला काय विचारयचे असे समजतात.जरी कोणतेही निर्णय गोष्ट वस्तू ते काही हि असू शकते पण बायकोला ग्राह्य धरत च नाही .

एकमेकांचा आदर करा 
एकमेकांचा आदर करा म्हणजे काय करणे तर आपण च आपल्या नवऱ्याची  किंवा बायकोची अगदी आदर ने बोलले पाहिजे. आपला नवरा किंवा बायको ला प्रेमाने बोलले पाहिजे.  आपण समजत कुटे ही वावरताना आपला सन्मान होईल असे वागळे पाहिजे.जर आपण एकमेकांची कदर नाही केली तर समाज आणि मित्र नातेवाईक कसे काय करणार. त्यामुळे  नेहमी चांगले बोला, वागा आपला संसार चांगला फुलवा.नेहमी दोघांनी सकारात्मक विचार करा.

रागावर नियत्रंण ठेवणे
 गाडीची दोन्ही  चाके ही नीट चालली पाहिजे.कारण नीट नाही चालली तर गाडी चा acident होईल.तसेच नवरा बायकोचे पण आहे.एकाने नीट चालून उपयोग नाही तर दोघांनी नीट चालले पाहिजे.महत्वाचे म्हणजे राग हा खूप  भयानक असतो.रगावर नियत्रंण नाही केले तर होत्याचे निव्हते होऊ शकते. संसार म्हंटले भांडण होणार रुसवा फुगवे प्रकार होणार . त्यातून पार पडयचे आहेत तर प्रतेक गोष्टीवर नियत्रंण ठेवले पाहिजे.

पोष्टिक आहार  घेतले पाहिजे  
आपण  जर आहार नीट  घेत नसेल तर माणूस आजारी पडू शकतो.आणि बाहेर चे अन्न कधीच खाऊ नये. कधीतरी खाऊ शकता ,परंतु त्याचा परिणाम आपल्या शरीरावर पडू शकतो आणि आपण आजारी पडू शकतो. महत्ववाचे म्हणजे बचत करणे खूप गरज आहे . दोघांच्या तब्येत चांगली असावी कारण एक जरी  सारखे आजारी पडत असेल तर  टेन्शन तर येते बाकी सगळ्या गोष्टींचा पण परिणाम पडू शकतो नात्यावर, म्हणून चांगले आहार घेतले पाहिजे. त्याचबरोबर फिटनेस ला खूप महत्व आहे दोघांनी ही व्यायम  केला पाहिजे.किंवा एखादी जिम जॉईन केली तर दोघांचे  वर्कआऊट सोबत होईल आणि तेवढा टाईम सोबत घालवता पण येईल. योगा,मेडिशन पण केले पाहिजे यांनी तुमच्या नात्यात आणखी फुलेल.  फक्त फिटनेस शारीरिक सुखासाठी नव्हे तर मानसिक आरोग्य पण राखले पाहिजे ,त्यासोबत आपण फीट राहवे कोणतेही आजार आपल्याला होऊ नये.  दोघांपैकी एक जर व्यक्ती सारखा आजारी पडत असेल तर काय सारखा सारखा आजारी पडतो म्हणून आपले मन हे दुसरीकडे वळू शकते किंवाआपल्या मनात त्या व्यक्ती बद्दल दुमत व्हायला वेळ लागत नाही.सोबत  घरचा खर्च, हॉस्पिटलचा खर्च वाढू शकतो. नवरा बायकोच्या नात्यात कधी पन दुरावा येऊ शकतो त्याला बरीच करणे असतात. ते म्हणजे नवरा बायकोच्या आयुष्यात  तिसरं व्यक्ती येते तेव्हा तो जास्त  फरक येऊ शकतो कारण जबादारी वाढते,खर्च वाढतो, एकमेकांना वेळ देता येत नाही.

विश्वास असला पाहिजे
विश्वास ही अशी गोष्ट आहे की नवरा आणि बायकोने मरेपर्यंत जपली पाहिजे ते म्हणजे विश्वास होय.कारण एकमेकाप्रती  प्रामाणिक पने राहिले पाहिजे .कारण जर त्यांच्या नात्यात तर संशय निर्माण झाला तर, संसार उद्ध्वस्त होऊन दोघांचे आयुष्य  मती मोल होऊ शकते. सततच्या भांडनामुळे नवरा बायकोचे संसार उद्ध्वस्त होऊ शकतो तर त्याचा परिणाम यांच्या मुलावर पण होऊन त्यांचे जीवन मोड्याला वेळ लागत नाही किंवा मुले चुकीच्या मार्गावर जाऊन जीवन संपूवू शकते.

प्रेम व्यक्त ,स्तुती,प्रशसा,कौतुक केली पाहिजे.
सततच्या धापलीच्य युगात आणि कामामुळे व्यस्त झाल्यामुळे, प्रत्येक नाते हे रिअल पेक्षा जास्त फेक वाटत आहे कारण. प्रेम ,प्रसशा, कमी झाले आहे  कारण बायको ही नवऱ्याचा आवडीचे पदार्थ खाऊ घालत असते. परंतु नवऱ्याला कामाचा ताणामुळे बोलणे तर अगदी कमी झालेले असते,तर ते पदार्थ छान झाले हे सांगणे आवडत नसते. त्यांना असे वाटत असते की,ती रोजच जेवण बनवते.मग काय रोज सांगायचे तर तसे न करत तिचे प्रत्येक वेळी  रिस्पॉन्स केला गेला पाहिजे .कारण जर तिला तसे नाही तिचा मुड ऑफ होऊन तुमच्या नात्यात थोडा तरी दुरावा येऊ शकतो .बायकोला फक्त चार प्रेमाचे शब्द,स्तुती केलेले आवडते.आणि आपले प्रेम आहे आणि ते व्यक्त करायलाच पाहिजे .आणि ती काळाची गरज आहे. तिच्या प्रत्येक कामांचे कौतुक झाले पाहिजे, आणि समजून सांगितले पाहिजे.तिला 

 आज आपण नवरा बायकोचे नाते निबवताना या ७ गोष्टीं जाणून घेतल्या. तुम्हाला कसा वाटला या ,७ गोष्टी जर आवडल्या असेल ते कॉमेंट करून नक्की सांगा.आणि अजून कोणत्या गोष्टी राहिल्या ते पण सांगा मी लिहिण्याच्या प्रयत्न करेन.

धन्यवाद !

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)