रक्षाबंधन | Rakshabandhan | ती आणि तिचे अस्तित्व

0

 रक्षाबंधन

   रक्षा

रक्षाबंधन म्हंटले की, बहीण भावाला ओवाळते  आणि ती भावाच्या हातावर राखी बांधत असते.असे चित्र लगेच आपल्या डोळ्यासमोर दिसू लागते. आपले आई वडील आपल्याला लहानपणापासून सगळ्या गोष्टीचे महत्व सांगत असतात. आणि संस्कार करत असतात. बहीण भावाला राखी बांधते. तो एक प्रकारचा एक धागा असतो.त्या दिवशी खूप महत्व असते त्या धागा ला. जो काही धागा असतो तो काही साधा सुधा घागा नसतो.

तो धागा आपल्या भावाचे रक्षण करत असतात.त्या धागा मधे आपल्या भावना असतात. की, माझ्या भावाचे संरक्षण करेल म्हणून त्यावरून बहीण बाबाचे अतूट बंधन नाते समजते.भाऊ आपल्याला गिफ्ट देत असतो.किंवा पैसे किंवा काही तरी वस्तू देत असतो.आणि पण त्याला हक्काचे मनात असते.


 रक्षाबंधन |  Rakshabandhan | ती आणि तिचे अस्तित्व 



रक्षाबंधन हा सण ऑगस्ट महिन्यातील श्रावण मधे येतो .रक्षा म्हणजे रक्षण करणे बंधन म्हणजे त्या दोघामधील मधील अतूट नाते हे , कधीच तुटत नाही किंवा असेच नाते घट्ट बांधून जाते. ती रक्षा बांधते करी तो रक्षण  करी.म्हणजे रक्षाबंधन होय. एक बहिण भावाला राखी बांधते कारण भावने आपल्या बहिणीसोबत खंबीरपणे उभे राहावे.प्रत्येक संकटाच्या काळात बहिणीला एकटीला टाकू नये.तिला नेहमी मी आहे असे म्हणणरा भाऊ पाहिजे असते. म्हणतात ना दहा  हत्तीचे बळ एका भावामधे असते.

आई वडील च्या नंतर सांभाळणारा फक्त तोच असतो . किंवा आईची प्रेम ममता,दाखविणारा तो भाऊच असतो.टेन्शन घेऊ नकोस मी आहे असे बोलाल्यने बहिणीला आधार वाटतो.आणि तिचा तो आधारस्तंभ असतो. आपल्या हिंदुसंकृतीत प्रत्येक सणाचे इतिहास आहे.आणि खूप मान्यता आहे.

जेव्हा श्री कृष्ण  ला हाताच्या बोटाला  लागले असता रक्त आल्याने पाच पाडावाची पत्नी द्रोपदी ने आपल्या साडीचे पदर फाडून  श्री कृष्णाच्या बोटाला गुंडाले तेव्हा पासून बहीण भावाचे नाते उदयास आले म्हणतात.
परंतु जेव्हा द्रौपदीला गरज होती तेव्हा श्री कृष्ण ला हाक मारली तेव्हा तिचे वस्त्र हरण करताना श्री कृष्णाने तिला साडी पुरवली म्हणून श्री कृष्णाने त्या चींधीची परतफेड केली किंवा एका भावने एका बहिणीला मदत केली.

बहीण भवामध्ये पण प्रेम भांडण तंटा किंवा खोड्या  वैगरे होत असते.त्याशिवाय बहीण भावाच्या नात्याला अर्थ येत नाही. बहीण भावाच्या प्रेम आणखी घट्ट करणारा हा सण असतो.

मला आठवते की,आम्ही ४ भावंडे आहोत २ बहिनानी २ भावे आहोत. मोठी ताई आणि मी आणि माझे २ भाऊ.आम्ही दोघी मोठ्या आहोत आणि आमच्यापेक्षा दोन्ही लहान भाऊ आहेत. रक्षाबंधन सण आला की मज्जा यायची कारण आम्हला ओवाळणी मिळणार म्हणून तेव्हा एवढे काही नव्हते हे दिले पाहिजे कि ते दिले पाहिजे म्हणून ताटात एक रुपया ओवाळणी मिळालं तरी खुष व्हयाचे.

तो किस्सा सांगते की, ताई ही माझ्यानंतर पाठीच्या भावाला राखी बांधायची आणि मी छोट्या भावाला .माझ्या पतीनातर भाऊ जर समजूतदार आहे.आणि छोटा भाऊ जरा चंचल असायचा  लहान असेल की,काही समजत नाही ना ?
जेव्हा आम्ही रक्षबांधन करायचो ना म्हणजे सकली लवकर उटून कधी राखी बंधन असे असायचे. सकाळी लवकर उठून ओवलिनीचे ताट साजयाचे  त्यावेळी राखी विकायला शाळेत यायच्या ते पण अध मुलाने बनविली असे आम्हला सांगितले जाई. त्या राखी गोंडे,फुलपाखरू,बरीच नक्षी डिझाईन क्या असायचे.

दोन्ही भावाना पाटावर बसून कुंकू अक्षता टाकून आरतीचे ताट ओवाळून राखी बांधली जायची. ओवाळीणी  म्हणून ताटात पैसे दिलेले  असायचे.ते पण बाबांनी दिलेले असायचे कारण तेव्हा आम्ही लहान होतो काम करायचे कारण नसते.
राखी बांधून झाले की,पैसे टाकायचे १००,२०० त्यावेळी १०० रुपये म्हणजे खूप काही होते .

ताई जेव्हा राखी बाधून आरतीचे ताट ओवाल्यची तेव्हा तिला पैसे मिळाल्याचे अग मी राखी बांधायची. आरतीचे ताट ओवाळून तो पण ताटात पैसे द्यायचा  आणि सगळे झाले की,पैसे घेऊन पाळायचा .मला पैसे च द्यायचा नाही तेव्हा खूप राग यायचा ,ओरडायचे पण तेच क्षण आठवले की हसू येते.

प्रत्येक रक्षाबंधन ला आम्ही खूप हसतो .तसा तो काही खूप काही देत असतो. 
खूपच छान क्षण असतात.त्या आठवणी आत्ता ही मला लिहिताना  खूप हसयला येते .ते दिवस खूप छान असतात.ना? खूप निरागस असते आपले बालपण आपल्याला समजत नाही आपण काय करतो?  खूप छान वाटते. असे वाटते तो क्षण पुन्हा जगायला मिळेल का ? पण असे नाही होत. म्हणून म्हणतात ना की लहान देगा मुंगी साखरेचा रवा..
तुम्हाला पण तुमच्या लहानपणी चे दिवस आठवले असतील ना?. बहिंणभाऊ  तुम्ही काय मस्ती करता ना हो ना ?
कसा वाटला लेख तुम्हा ला नक्की कॉमेंट करून सांगा .आणि आणखी लेख वाच्यचे असेल तर हे सुधा वाचा .पावसाळा | rainy season

रक्षाबंधन चे महत्व काय आहे?
 रक्षाबंधन म्हणजे ह असा सण आहे की लहानापासून ते मोट्यापसून हा सण साजरे करत असते. बहीण ही आपल्या भावाच्या दिर्घ औष्यसाठी प्रथम करत असते.आणि भावने आपल्या संरक्षण करण्यासाठी राखी बांधत असते.  म्हणून या सणाचे खूप महत्व असते.

रक्षाबंधन या सणाचे दुसरे नाव काय?
या सणाला पण राखी पौर्णिमा असे ही म्हणतात. हा सण भाऊ बहिण  सण म्हणून ओळखला जातो.

रक्षा बंधन कधी आहे?
रक्षाबंधन हे  येत्या पौर्णिमा ३० ऑगस्ट  २०२३  ही बुधवारी येत असून  या दिवशी साजरा करण्यात येते. 

राखी कोणत्या हातावर बांधली जाते?
 भाऊ आणि बहिण याच्या नात्याला आणखी घट्ट करणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन होय .बहिण हि भाऊ च्या उजव्या मनगटावर राखी बांधत असते.  

2023 मध्ये रक्षा बंधन 30 किंवा 31 तारखेला आहे का?
 रक्षा बंधन हा श्रावण महिन्यातील  खूप मोठा सण हा म्हणजे रक्षाबंधन. महिन्यातील बुधवार ,३० अगस्त  रोजी आहे.








Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)