|एकतर्फी प्रेम | one side love |

0

 एकतर्फी प्रेम काय असते | one side love 


  एकतर्फी  प्रेम म्हणजे काय ?  दोन्ही बाजूने असणारे प्रेम म्हणजे काय ? आणि प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या बघत असतो. प्रेम म्हटले की, आपल्याला फक्त एक कपल आठवते. ते प्रेमामध्ये एकदम बुडून गेलेले असतात. वेगवेगळे डे साजरा करत असतात.परंतु  प्रेम हे दोन्ही व्यक्तीकडून असायला पाहिजे.कारण एकतर्फी प्रेम असून उपयोग नसतो. प्रेमामध्ये दोघाच्या भावना,प्रेम विश्वास आपलेपणा या गोष्टी येतात. पण आपण लहानपण पासून टीव्ही बघत मोठे झाले.त्यामधे हिरो आणि हिरोहिन आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. आणि तेच बघत आपल्या आयुष्यात पण करत असतो.काही काही सिनेमाध्ये एकतर्फी प्रेम दाखवले जाते,कधी सोफ्ट कॉर्नर असते,तर कधी खूप भयानक असते. 
चला तर बघा एकतर्फी प्रेम म्हणजे काय ?


 एकतर्फी प्रेम | one side love 

एकतर्फी प्रेम म्हणजे एकाच व्यक्तीकडून प्रेम असणे होय.
 एक मुलगी जेव्हा एका मुलाशी बोलते तेव्हा एक मित्र म्हणून च बोलत असते. तिच्यासाठी जशी एक मुलगी तीची मैत्रिन असते तशी ती बोलत असते.जर तिचे एहाद्या मुलावर प्रेम असेल तर ती प्रेम व्यक्त करते. पणतू जर तिचे प्रेम नसेल तर ती नाही म्हणू शकते. 

मुलगी काय मुलाशी हसून काय बोलली तर तुम्ही चुकीचा अर्थ काढता की, तिचे तुमच्यात प्रेम वैगरे आहे. असा समज करून घेत असतात.  हा तिचा हक्क असतो तिचा अधिकार असतो.
तुम्ही मुलांनी तिच्या नकार चां आदर केला पाहिजे. ती मुलगी तुमच्याशी नाही बोलले तर मनावर नाही 
एखादी मुलगी तुम्हाला नाही बोलली की मुलाने  मनावर घ्ययचे नाही.

आत्ताच घडलेल्या  घटना समोर येत आहेत जसे की ,दर्शना पवार, ही विद्यार्थिनी तिने तिच्या मित्राला लग्नाला किंवा प्रेमला नकार दिल्याने ती ला तिचा जीव गमवावा लागतो.  काय चूक होती तिची ? काय केले पाहिजे? सांगा ना .एका आई ने आणि वडिलांनी आपल्या मुलीला गमवले आहे.त्यांच्या आई वडीलांची काय चूक होती? किती त्रास झाला असेल तिच्या आईवडलाना विचार करण्याची वेळ आहे.

 ती ने एमपीएससी मधील पोस्ट  मिळाली होती. काय त्या कष्टाचे काय उपयोग झाले सांगा? आज अश्याच  खूप घटना घडत आहे. तसेच दर्शना पवार ची घटना नुकतीच ताजी असताना पुण्यामधील सदशिव पेठेमधे एक मुलगा एका मुलीला कोयत्याने माऱ्यला चालला होता. असे आपण दृश्य पाहत होतो.किती भयानक आहे हे सगळे आपण कल्पना पण करू शकत नाही. त्या मुलीवर  काय संकट ओढावले होते जर mpsac   मधला तरुणांनी जर त्या मुलीला वाचवले नसते आज त्या मुलीला जीव गमवावा लागलाअसता.

.कारण काय होते प्रेमला नकार दिल्याने. किती वाढत आहेत या समस्या ?  हे सगळे दृश्य पाहून मुलीच्या मनात आणि आई वडीलंच्या मनात  भीतीचे वातावरण तयार झाले आहे. काय करावे ? असा प्रश्न मुलिसमोर निर्माण झाला आहे. मुलाशी बोलावे की नाही.किंवा ज्या मुली शिक्षणासाठी बाहेर गावी   असतात किंवा ज्या मुली शहरात राहतात अश्या मुलींना खूप  टेन्शन आलेले आहे.


 ज्या मुली बाहेर गावी तून शहरा ठिकाणी येतात आणि शिक्षण घेत असतात. अश्या मुलींना त्यांच्या घरचे आत्ता घरी बोलवत आहे.कारण अश्या वातावरणात मुली कश्या काय राहणार .सगळ्यांना मधे भीती चे वातावरण झाले आहे.
 आणि मुली आज  घाबरतात बाहेर पडायला.तांच्यामोर बरेच प्रश्न निर्माण झालेत की, खरच मुलाशी बोलायचे की नाही .

 तर मुलांनी कोणत्या गोष्टी कडे लक्ष दिले पाहिजे 

मुली ने  प्रेमाला  किंवा लग्न ला नकार दिल्याने तिचा आदर केला पाहिजे.

मुलगी प्रेमाला किंवा लग्नाल नाही म्हणते याचा अर्थ तिचे ड्रीम्स किंवा तिला हवा असणार पार्टनर हा वेगळा असू शकतो.

मुलीला  कमकुवत समजले नाही पाहिजे.

मुलगी ही वस्तू नाही की, तिला जसे खेळण्यातील समजता.

मुलगी ही तुमच्याशी मैत्री चे नाते मानते ना ,मग तिचे ह्या नात्याचा पण आदर केला पाहिजे.

मुलगी तुम्हाला नाही म्हंटले की तुम्ही बदलाची भावना न ठेवता तुम्ही तुमच्या आयुष्यात फुढे जा.

तुम्ही तुमच्या बदलण्याच्या भावनेने तुम्ही आणि तुमच्या मैत्रनीची पण आयुष्य  उध्वस्त करता. 

आपल्या आई वडिलांचे स्वप्न किंवा तुमचे भविष्य कडे लक्ष दया.

आपल्या आई वडीलाशी सगळ्या गोष्टी शेअर करत जा किंवा  चांगल्या मित्राकडे करा.


 मुलींनी कोणती काळजी घेतली पाहिजे.

मुलींनी पाहिले कोणत्याच व्यक्तीवर विश्वास ठेऊ नये.

कोणत्या ही मुलाशी मैत्री करताना आधी बगत चला की, त्याचा स्वभाव कसा आहे तो  काय करतो, कुटे राहतो किंवा त्याचे बॅकग्राऊंड कसे आहे.

मुलींनी कटाक्षाने पाळली पाहिजे ते म्हणजे तुम्ही कुटे ही बाहेर जा पण आई ला सागून जात जावे.
काही जरी प्रोब्लेम झाला तरी घरी फोन करून सांगणे.

कधीच कोणती ही गोष्ट ही लपून ठेऊ नये .

मुलींनी स्वतः चे रक्षण स्वतः करता यावे या साठी कराटे प्रशिक्षण घ्यावे.


खर तर दोन्ही बाजू सामजाऊन घेतले पाहिजे मग हि वेळ येणार च नाही  कसा वाटला लेख तुम्हला ? नक्की  कमेंट करून सांगा आणि अजून काय राहिले असेल तर नक्की कळवा .  प्रेमाचा दिवस अजून तुम्हाला आमचे लेख बगयाचे  असेल तर चेक करा .  मला फ्क्थ यातून सांगयचे आहे कि, जे गुन्हे घडतात ते होणार नाही आणि आयुष्य वाया जाणार नाही . प्रेम करावे  पण कोणलाच त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे . सगळे मुलेच वाईट नसतात, हे तुम्ही पहिले कि यशपाल सारखी पण मुले आहेत .आपण दोन्ही बाजू समजून सागत आहे. ती चे अस्तित्व वर खूपच प्रश्न निर्माण झाला आहे . तुम्हला पण तसे वाटते का ? नक्की सांगा .


धन्यवाद !



Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)