|MC म्हणजे काय असते ? मासिक पाळी म्हणजे काय | What is MC? What is Menstruation? |

0

MC म्हणजे काय असते | मासिक पाळी म्हणजे काय ? 

एमसी म्हणजे  दर महिन्याला (स्त्री) मुलीच्या योनीमार्गातून रक्त स्त्राव होतो त्याला आपण एमसी म्हणतो. मासिक पाळी सुद्धा म्हणू शकतो. इंग्लिश मधे त्याला ( menstrual period ) असे ही म्हणतात.
 

दर महिन्याला योनीमार्गातून एक परिपक्व बीजांड बाहेर येत असते.  गर्भ धारणेसाठी तयारी  करत असते.  त्यामुळे आपल्याला मासिक पाळी येते. हि कोणची २८ दिवसाची असते तर कोणची २४ किवा २५  दिवसाचा कालावधी असतो . जवळपास मुलीचे वय हे १२ ते १३ वर्ष असते. ती ६ किंवा ७ वी ला असेन, किंवा ८ वी ला असेन 
.
प्रत्येक मुलीला कधी लवकर येते तर कधी उशिरा पण येते.मासिक  पाळी ५दिवस  ते ८ दिवसाची असते.जेव्हा सुरुवातीला येते तेव्हा तिचा काळ जास्त असतो.मग  तो कमी कमी होत जाते. 

या दिवसात प्रत्येकाला आरामाची गरज असते.  आणि या ५ ते ८  दिवसात खुप ञास होतो किंवा होत ही नाही. प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळे असते.त्यामुळे होणारा त्रास ही वेगळा असतो.

काही ना ओटी पोटात खूप दुखते तर काहींना कंबर आणि पाटीत दुखते तर काहींना पायच्या पिंड्यमधे दुखत असते किवा पायात गोळा येते,असा हा वेगवेगळा त्रास असतो.


काही मुलीना मासिक धर्म यायच्या आदी पासून त्रास होतो, तर काही ना मासिक धर्म आल्यानंतर त्रास होतो.
या दिवसांमध्ये योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.कारण मुलींच्या शरीरातील अशुद्ध रक्त हे बाहेर टाकले जाते.  त्याने आपले शरीर हे चांगले राहते.म्हणून या दिवसात आराम करायचा असतो.  या  दिवसात खूप काळजी घावी लागते


मासिक पाळी म्हणजे काय असते ? ती आणि तिचे अस्तित्वविटाळ म्हणजे काय 

पूर्वी च्या  काळी स्त्रियांना खूप कामे करावी लागत असे. बिलकुल या मासिक पाळी मधे त्यांना बिलकुल आराम मिळत नसे. म्हणून ज्या मुलींना ,स्त्रियां ना पाळी आहे त्या ना ५ दिवस बाहेर बसवले जायचे.

 जेणे करून त्यानं आराम मिळावा म्हणून.पण त्या काळी स्त्रियांना पाळी आली की, वेगळीच दृष्टीने बगायचे, पाळी म्हणाजे विटाळ समजायचे. 

५ दिवस त्यांना शिवायचे  नाही म्हणाजे त्यांना स्पर्श नाही करायचे आणि मेन कारण त्यावेळी बाहेर बसवले जायचे जेणे करून स्पर्श नाही झाल पाहिजे. त्यांची भांडी पण वेगळी असायचे. किती ऑड वाटते ऐकायला पण ना  तुम्ही यातून गेला आहात का ? जर गेले असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा .

मी पण यातून गेली आहे.  जर  भूक किंवा पाणी  तहान लागले असेन तर त्यांना सांगायचे आणि तेव्हा ते पण वरतून पाणी द्यायचे.आणि जेवण ची टात सरकून देणे असे असायचे .

पण एक लक्षात येते का त्यावेळी स्त्रियांला आराम करायला मिळत न्हता म्हणून या ५ दिवसात आराम करावे म्हणून बाहेर बसवले असायचे. या ५ दिवसात मानसिक आणि शरिरक हाल व्हायचे. 

कारण पूर्ण शरीरात हरमोनालनात बदल व्हायचे ,म्हणून चीड चीड करणे, मुड स्विंग ,राग येणे,असे काही प्रकार होतात.

 मासिक पाळीत आहार कसा  असावा

मासिक  पाळी मधे जे होणार त्रास आहे ते कमी करण्यासाठी आपल्या आहारात बदल केला पाहिजे. ते म्हणजे एकदम हलका आहार घेतले पाहिजे 
. वरणभात,तूप असा आहार घेतला पाहिजे.या दिवसांमध्ये नॉनव्हेज खाणे टाळावे कारण हा आहार खुप digest व्ह्यायला वेळ लागतो .आदीच आपले हार्मोन बिग्डलेले असतात. म्हणून पोषक आणि हलका आहार घ्यावा.  

तेलकट , मसालेदार , गरम जेवण करू नये . कारण आपल्याला त्रास कमी  होण्यापेक्षा त्रास आणखी वाढेल. तसेच गोड पदार्थ टाळावे ,त्याने त्रास  वाढू शकतो. 

मासिक पाळीत घ्याव्यची काळजी 

मासुक पाळी म्हंटले कोणलाच आवडत नाही कारण ते ५ दिवस अगदी कोणत्या मुलीला किवा स्त्रीला आवडत नाही . पण देवाने दिलेले वरदान आहे.या ५ दिवसात खुप त्रास होतो. प्रत्येकाला होतोच असे नाही. 

कोणाला कळत पण नाही .येते कधी आणि जाते कधी. तर या दिवसात दोन   चड्डी या  वेगळ्या ठेवावे. फक्थ त्याच दिवसासाठी वापरावे.जास्त घट्ट कपडे वापरू नये

. थोडेशे सैल असावे.या दिवसात कोणतेही व्यायाम करू नये . जड असलेले वस्तू उचलू नये.जेवण वेळेवर करावे .तुम्हाला यायाम करायचे असेल तर या ५ दिवसात करू नये पाहिजे असेल तर नंतर करावे .  

वाटल्यायास तुम्ही ध्यानधारणा  करू शकतात.  या दिवसात पाणी भरपूर प्यावे. फ्रेश  राहण्यासाठी  संगीत ऐकावे, सकरात्मक  गोष्टी ऐकावे,वाचयला पाहिजे. 

आपला त्रास कमी करण्यसाठी  गरम पिशवी  { hot water bag }चा वापर केल्याने थोड आराम मिळू शकतो .   गरम पिशवी नेहमी सोबत्त ठेवले पाहिजे .  मला तर तिचा खूप  आधार असायचे . 

दुसरा  तुमचा आधार म्हणजे आई किवा नवरा असू शकतो . या दिवसात  तिला  आधारची गरज असते .  कारण  तिला होणाऱ्या वेदना ह्या असह्य असतात. तिला होणार त्रास समजून घेण्यची गरःज  असते .  

   मुलगी माहेरी असले कि  आई हि नेहमीच समजून घेते. प्रश्न येतो मुलगी सासरी असतना तिला कोणचा च आधार नसतो. ज्यासोबत लग्न करून आली त्या व्यक्तीचा  आधार खूप महत्वाचा असतो. 

हे ५ दिवस  तिच्यसाठी खूप महत्वचे असते. प्रत्येक नवर्याने तिला समजून घ्या हि माझी नम्र विनंती आहे.
 pad  हा ६ किवा ५ तासांनी  बदलेले  पाहिजे कारण नाहीत  infection   होऊ शकतो . 

मासिक पाळीत  कोणते  sanitary pad वापरावे

व्यक्ती तीतक्या  वल्ली असे आपण  म्हणतो अगदी तसेच आहे . प्रत्येकाची शरीराची ठेवण हि वेगळी असते.   त्या मुले  होणार त्रास पण हा वेगवेगळा असू शकतो .

प्रत्येकाला  कोणत्या नाप्कीन वापरावे आणि कोण चिंतामुक्त असते नाप्कीन वापरल्याने ते वेगळे असू शकते . काहीना  सूत होते काहीना होत नाही . आज् सगळीकडे  sanitery pad  उपलब्ध आहे.  सध्या whisper , sofi everten   stayfree ,nine  , कप अश्या अनेक ब्रांड उपलब्ध आहे . 

 सुरुवातीला  कापड हि  वापरले जायचे . ते  खूप   रिस्क असायचे . वापरताना भीती वाटयची कि, ते पडणार तर नाही  ना खूप प्रश्न असायचे  पण आत्ता असे नाही .मार्केट मध्ये  भारी sanitarypad  आले आहेत

 . sanitery pad  वापरल्याने  कुठलीच  रिस्क  नसते . आणि आपण  न  घाबरता  बिन्दास्त  वावरू  शकतो .  भीती नसते कसली  लेकेगे  होईल का पडेल का आत्ता काय करावे  अश्या प्रश्नांना   आत्ता पूर्णविराम  मिळाला आहे.

sanitery pad  म्हणजे काय असते ?

   sanitery pad    किवा  नाप्कीन  हे एक रक्त शोष्ण्यचे  pad आहे. जेव्हा तुम्हला  मासिक पाळी  येते तेव्हा तुम्ही  pad  वापर केला तर  येणार रक्ठ्प्रवाह हा शोषून घेते आणि तुम्हाला तुमच्या सोयीनुसार size मिळते   त्यामुळे  तुम्ही comfert होऊ शकतात .


sanitery pad कसे  व वापरू शकता  
sanitery pad हे वापरण्यास खुप सोपे आहे . sanitery pad  पाठीमागची बाजूला कागद असतो तो काढा आणि तुमच्या    तुमच्या  pantivar ठेवा .

 माझा  अनुभव 

  माझा अनुभव सांगयचे म्हंटले तर मला १३ वर्षाची  असताना मासिक पाळी आली .मासिक पाळी म्हणजे काय असते कि,फक्थ दर  महिन्याला मासिक पाळी येते एवढेच माहित होते.  

कारण माझ्या बहिणीला आले ले पाहिले होते. त्या दिवशी आई ला आनंद पण होतो आणि जरा टेन्शन पण असते.मुलगी वयात आलेली असते. 

मासिक पाळी आली का मुलगी मोठी होते .म्हणे हे खर आहे का?तुम्हाला काय वाटते ते सांगा कॉमेंट करून .
 मासिक पाळी येताना कंबर, ओटी पोट दुखायचे. 


MC  म्हणजे काय असते ?  मासिक पाळी म्हणजे काय | What is MC? What is Menstruation?  ती आणि तिचे अस्तित्व

MC म्हणजे काय आहे ?                                       

मासिक पाळीत  आहार कसा असावा ?             
                                        
विटाळ   संकल्पना 
                                                                                                                           
मासिक पाळी येताना त्रास काय काय होते ?

मासिक पाळी काय काय काळजी घायची आहे ?

मासिक पाळीत sanitery pad का वापरावे ?

तुम्ही मासिक पाळी मधे तुमच्या आई  बायकोची,बहणीची,मैत्रीण ची कशी काळजी घेता ? नक्की कॉमेंट करून सांगा .
 आता  नुकतीच घडलेली घटन ने सगळ्यांना हादरून ठेवले म्हणजे की,उल्हास नगरमध्ये एका १२ वर्षीय मुलाचा खून झाला ते पण सख्या भावने केला तो भाऊ ३० वर्ष चा होता.त्या भावला पोलिसांनी अटक केले.

आणि विचारले की तू असे का केले.त्यानंतर त्याचे म्हणे ऐकून सगळेच घाबरले.त्या १२ वर्षी मुलीला नुकतेच मासिक पाळी आली होती आणि तिच्या ड्रेस वर रक्ताचा डाग पडला. तिला पण माहीत नोवते काय झाले म्हणून. तिच्या भावाला असे वाटले बहणीचे बाहेर अफेयर चालू आहे. 

ती सेक्स करून आले आहे म्हणून.तिच्या भावने तिला बेदम मारण्यास चालू केले .तिला पण कळेना काय चाललाय आणि भाऊ का मरतो.ती पण घाबरले होती.त्यात च तिचा मृत्यू झाले.या वरून तुम्हाला काय समजले ते नक्की कॉमेंट करून सांगा.


मासिक पाळी ही नैर्गिकदृष्टया सगळ्या मुलींना येते. पहिल्यांदा आली मुलींना समजत नाही.तेव्हा आई ने समजून सांगितले पाहिजे . जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा आई ने आपल्या मुलीला ना   mc  म्हणजे काय हे सांगणे गर्जे चे आहे. का मासिक पली येते ?  मासिक पाळी आल्या ने काय होते ? पूर्ण संकलइत माहिती सांगणे गरजचे असते.

जागरुकता

आपण फक्त मुलींना सांगतो की,कोणापुढे बोलायचे नाही. साधे सनिटरी पड आणायचे तर आपण विक्रेते पेपर मधे गुंडाळून देतात कारण कोणला  कळ्याला नको, लाज वाटते अश्या घटना आपल्या सोबत होत असतात.

आत्ता जागरूक होण्याची गरज आहे कारण एका गैर समजमुळे एका नाहक १२ वर्ष मुलीचा बळी गेला.म्हणून आत्ता मुलांना नेहमी उसुक्ता असते .

काय असते पण तेव्हा त्यानं माहिती मिळत नाही . आणि महत्व समजत नाही .जेव्हा त्यांचे लग्न होते तेव्हा त्यांच्या बायको ल मासिक पाळी येते तेव्हा कळते की, किती त्रास काय काय कशतून जावे लागते ते ५ दिवस. तिची कशी काळजी घेता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

पुरुषांची मानसिकता बदल ने गरजेचे आहे. 

आत्ताच्या समजात प्रत्येक मुला ला आपल्या आई ने सांगितले पाहिजे जेणेकरून  स्त्री चे आणि मुलींचे महत्व समजेल.स्त्रीला या दिवसात खूप आदराची गरज असते

.तेव्हा या ५ दिवसात मुलांनी किंवा भाऊ ,बाबा,नवरायने तिला आधार दिले पाहिजे .महंजे काय केले पाहिजे या ५ दिवसात तिला कामे लाऊ नये. तिला आराम करून द्यावा जेणे की तिला होणारा त्रास कमी होय ला मदत होईल.

या ५ दिवसांमध्ये तुम्हाला जेवण बनविण्याची आणि बाकी कामे करण्याची सवय लागेल. कोणतेही काम तुम्ही सहज करू शकाल. हे माझे काम नाही किंवा हे तिचेच काम आहे अशी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. 

आणि हो हे हि वाचा एकतर्फी प्रेम | one side love नक्की तुम्हला आवडेल.

पावसाळ्यात मासिक पाळीची काळजी कशी घ्यावी ?

२८ मे हा दिवस   menstrual higiene day( मासिक पाळी )  म्हणून साजरा केला जातो. जर्मनी ने मासिक पाळी मधे काळजी कशी घ्यावी, कशी  higiene  पालवी आणि जागरूक कसे करावे म्हणून या दिवसाची सुरुवात केली.
 • पावसाळ्यात  मासिक पाळी आली का प्रत्येकीला  नको वाटते कारण खूप किळस वाटते कारण बाहेर पाऊस पडत असतो आणि पाळीमध्ये पण खूप ओले आणि चिकट वाटते.

 •  चला जाऊन घेऊया कि , काय काळजी घेतली पाहिजे .

 • . मासिक पाळीमध्ये चांगल्या प्रकारचे  santery napkins  वापरले पाहिजे.

 • . सॅनिटरी नॅपकिन्स हे ३ ते ४ तासांनी बदलले पाहिजे.

 • . योनी मार्गातील जागा स्वच्छ पाण्याने धुतले आणि सूती  कपडा ने पुसून घेतली पाहिजे.
 • योनी  मार्गातील जागा कोरडी राहील पाहिजे.

 • नापकिन वापरल्यानंतर किंवा नॅपकिन काडल्या नंतर हात स्वच्छ धुतले पाहिजे.

 • सॅनिटरी नॅपकीन ची अलर्जे. होऊ शकते कारण स्किन खूप नाजूक असते.

 • पड आणि त्वचा  ची वारवार घासून  समस्या निर्माण होऊ शकते.  तसेच दोन्ही मांडीची घर्षण होऊन तिथे रशेस येऊ शकतात.

 •  या दिवसात कपडे घट्ट नाही घालायचे. जरा सैल कपडे घालायचे.

 • पावसाळ्यात बाहेर खूप पाउस पडत असल्याने निकर वाळत नाही त्यामुळे पण राशेस येऊ शकतात. अश्या वेळी ३ ते ४ जोड निकर ठेवावे कारण त्रास नाही होणार आणि ती जागा कोरडी राहिली इन्फेक्शन नाही होणार.

 •  अश्या वेळी चांगल्या प्रकारचे पड आणि सुरुवातीच्या २  ते ३ दिवसात  heavy bleding flow   जास्त असतो तेव्हा मोठ्या साइज चे पड वापर करायचे.

 • या दिवसात प्रायव्हेट पार्ट ल दिवसातून दोन तीन तीन वेळा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

 • अश्या वेळी दिवसातून २  वेळा अंघोळ करणे गरजेचे आहे .कारण या मासिक पाळी ने थकवा, मुड ऑफ ,चीड चीड आणि पावसाळ्यात तर खूप घाण वाटत असते. जो काही त्रास आहे कमी करायला मदत मिळते.

Tags

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)