बाबा | Dad
"बाबा" म्हंटले की आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभे राहते की,न थंकणार ,कडकं, शिस्तप्रिय, आणि आपण घाबरणारे बाबा आठवतात.जसे फणस ला वरून काटे असतात,आणि आतून कसा गोड फणसाचे गरे असतात तसेच आहे.आपला बाबा.आतून गोड, हलवा,दयाळू,मायाळू आणि आपल्या पिल्लावर खूप जीव,प्रेम करणारं असतो. आपण फक्त आई बद्दल खूप ऐकले,बोललो पण बाबा बद्दल कोण जास्त बोलत नाही.आई जरी आपल्या ला जन्म दिला असला तरी, बाबा त्याची कर्त्यव आणि जबाबदारी पूर्ण करत असतो.
प्रत्येक मुलीचा किंवा मुलाचा तो हिरो असतो.मुले जेव्हा पहिला शब्द जेव्हा उच्चारता तेव्हा त्याचे पहिले शब्द हे बाबा च असतात. तिचा बाबा खूप च वेगळा असतो.
तो आपले सगळे हट्ट पुरवत असतो.
बाबा - ती आणि तिचे असित्व |
काय पाहिजे ते नको ते बघत असतो. सगळ्यात आनंदचे क्षण जेव्हा असते की , तुमचा जन्म झाल्या वर तुम्हाला हातात घेतलेला असतो,तिथं पासून आपली जबादरी ओळखून दिवसरात्र घाम गाळत असतो.
कधी ही न बोलता प्रेम दाखवणारे हे बाबा च असतात. स्वतः साठी काही ही न आणणारे पण आपल्या मुलासाठी आणणारे बाबा आपण बघत असतो.प्रत्येकाला बाब चे प्रेम भेटते असे नाही तर.काहींना खूप प्रेम करणारे बाबा भेटतात.
बाबा हा घरचा मुख्य आधारस्तंभ असतो.तर आई ही घराचे मांगल्य असते. कर्ता करविता तो म्हणजे आपला "बाप" च असतो.कारण बाप जर घरात असेल तर कुणाची वाकड्या नजरेने बघण्याची हिमत नसते.
एवढे बळ हे बाबा मधे असतात. कसाही असला तरी तो आपला बाबा असतो.प्रत्येकाच्या बाबा च्या वाक्या वेगवेगळ्या असू शकतात.परंतु प्रत्येक बाबा चे कर्तव्य हे सेम च असते.
बाबा म्हंटले की आपण घाबरतो का तर बाबा या शब्दात भीती असते.आपल्या सोबत एखादी मोठी घटना घडली तर पाहिले शब्द उच्चारतो ते म्हणजे बापरे! असे निघते. म्हणतात ना कि मोठया गोष्टीसाठी बाबा लागतो. बाबा या शब्दामध्ये कड्क, शिस्त, जबाबदारी, कर्त्यव, सगळी बाजू. ही बाबा करत असतो.
आपले कुटुंब सुखी समाधानी राहावे या साठी तो आपली जीवाची परवा न करत दिवस रात्र एक करत असतो. कोणतेही सण असू दे पाहिले मुलांना घरतल्याना कपडे, वस्तू घेईल पण स्वतः वर एक रुपया खर्च करणार नाही.पाई पाई जोडत असतो संसारासाठी, मुलांसाठी
आपले आई बडील आपल्या साठी किती कष्ट घेतात ना ते आपल्याला समजत नाही. आपल्याला एखादी गोष्ट आवडली की बाबा हे छान ते छान आहे, हे घेऊया का ते घेऊया असे म्हणत असतो
परंतु आपला शब्द तोंडांत तून निघेपर्यंत ती गोष्ट आपल्या समोर हजर असते. हे फक्थ बाबा च करू शकतो.
एवढे प्रेम करत असतात. काय काय करावे लागते आपल्या पिला साठी ना ? जेव्हा आपण आई वडील होत नाही तो पर्यंत कळत नाही.
मुलगी म्हंटले बाबा चां प्राण, श्वास असतो,आणि मुलीचा ही असतो. मुलगी आपल्या वडिलांना च्या डोळ्यात कधीच पाणी बगु शकत नाही.
तसेच एक बाप पण आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या डोळ्यात पाणी बगु शकत नाही.तेवढे प्रेम तो करत असतो.
जेव्हा तिच्या काळजाचा तुकडा तो दुसऱ्याच्या स्वाधीन करतो तेव्हा तो डसां डसां रडत असतो.मी जसे संभाले तसे माझ्या मुलीला सांभाळेल ना? असे वाटत असते.जेव्हा मुलगी बाबा चे घर सोडून नवऱ्याच्या घरी जाते, तेव्हा तो क्षण ती मुलगी आणि बाप समजू शकते ,की त्यांची अवस्था कशी झाले ते सांगू शकत नाही.
बाप हा आपल्या मुलासाठी योग्य वर शोधत असतो.कोणती ही गोष्ट बघताना तो आधी चौकशी करून घेत असतो. हीच गोष्ट नाही तर प्रत्येक गोष्ट तपासात असतो .
आपण कोणती गोष्ट दिली पाहजे. दिली तर त्रास नाही न होणार याची सहा निशा करून देत असतो
आई ची थोरवी सगळीकडे सांगतात.पण बाबा चे बाप पण कोण सांगत नाही ,तर तो दारुड्या, व्यसनी, मारतो आहे. अश्या उपमा देऊन साबोधले जाते. बाप कधीच हा क्रेडिट घेत नसतो.
बाबा ला तेवढे मजबुत, संयमी बनावे लागते.आई सारखा रडून सांगता येत नाही.बापला पण रडायला येत असते. पण तो कधीच आपली बाजू मांडत नसतो.तो कदीच दाखवत नसतो की, कमकुवत आहे. म्हणून तो आतल्या आतल्या आत रडत असतो.पण त्याचा विचार कोण च करत नाही.
बाबा- ती आणि तिचे असित्व |
मी पाहिलेला बाबा कसा ते सांगते. बाबा हा अपुल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. जर तो नसेल तर सगळे च गणित बिगडले जाऊ शकतात.
कारण तो आहे तर घर असते. कारण घर हे त्याच्या पगारावर चालू असते.बाप हा कमून अणात असतो.तर आई ही अन्न शिजुवूनी जेवायला घालत असते. आता आपण बाबा ची थोरवी सांगितले.
बाबा हा जादूगार सारखा असतो.प्रतेक वेळी तो काही ना काही शिकवत असतो. आपल्याला वेगवेगळे न्यान देण्याचा तो प्रयत्न करतअसतो
.कधी व्याव्हारिक कधी गणित,तर कधी संसरिक,तर कधी जेवण बनून जेव्यायाला घालत असतो. किंवा शिकवत असतो.मला माझा खूप आवडायचा आणि आवडतो आणि आवडत राहीन.
माझा बाबा प्रत्येक वळणावर माझ्या सोबतीला असायचा.कधी शाळेत,तर कधी कॉलेज,तर कधी इंटरव्ह्यू ठिकाणी ते कधी फिऱ्यला न्यायचा कधी माहिती आणून संगायचा.
कधीच खिशात पैसे नसले तरी आहे ,म्हणून संगायचा. कुठूनतरी पैसे आणून द्यायचा .शाळेचा पहिला दिवस म्हणून तो सगळी नवीन दफ्तर, पुस्तके ,वह्या ,कंपास आणि पुस्तकाला कव्हर म्हणून तो घालत बसायचं.
काय ताई काय बाई म्हणून हाक दययचा काय अणू तुला म्हणायचं किती गोड त्या आठविणी किती गोड बाबा असायचा. आई काम सागे तेव्हा बाबा म्हण्यचा काम नको सांगू तिला असे तो आई ला बोलायचं म्हणुनी मला बाबा अवडयचा. किती थोर उपकार बाबा तुझे तू तर हा जन्म तू दाखवलास. आणि ही बाब सागे मन मोकळे केला ,तेव्हा वाटे मन मोकळे झाले. बाबा असतो प्रत्येकी सुख: दुःखात
खर म्हणजे मी जेव्हा आई झाले तेव्हा आई चे आणि बाबाचे महत्व कळाले. बाबा चे महत्व काय आहे ? हे मी जवळून पाहते .
जेवढे आई आपल्या बाळाला नऊ महिने पोटात सांभाळते तेव्हढेच किंवा त्यांच्या कितीतरी पटीने जास्त बाबा आपली जबाबदारी पूर्ण करत असतो.घर मुले संसार नोकरी सगळी धुरा त्याच्या हातात घेत असतो.
जसे बाळाचे जन्म होते तिथपासून तो काम करत असतो. जसे की बळाला घेणे,संभाळणे जर बाळ रडत असेल तर त्याला घेऊन फिरणे, दूध पाजणे (फॉर्म्युला मिल्क) इत्यादी जशी एक आई आपल्या मुलाला सांभाळते तसे तो करत असतो. अगदी पहिल्या दिवसा पासून करतोय आणि शेवटपर्यंत करत राहील याची काही शंका नाही. एक बाप पण संभळू शकतो.
मी जेव्हा माझ्या नवऱ्याला बघते की तो काय करतो आपल्या मुलांसाठी तो जे काही करतो तेव्हा लक्ष्यात येते. आपल्या बाबानी नी काय केले आपल्यासाठी ही जाणीव होते.
मनाला खूप छान ही वाटते आणि दुःख ही होते. कारण एक बापाला काय काय सहन करावे लागते ते समजू शकते .आणि तो बाप च असतो सगळे सहन करणार. किती त्रास ,किती रात्री जागून काढल्या.
ते किती ती धावपळ असते बाळ झाले तो एक आनंद असतो आणि ती ओढाताण पण असते.पण जेव्हा बाळाचे चेहरा बागितला की त्याचा त्रान, चिंता सगळे विर्गळून जाते.
किती ही त्रास होऊ दे काही झाले तरी तो आपल्या मुलांना घेणार म्हणजे घेणार मी आजपर्यंत असा बाबा कधीच पहिला नाही की तो सारखा आई ची आणि बाबा ची भूमिका पार पडताना दिसत असतो .
किती सहज पणे करू शकतो ना .कोणालाही ही हेवा वाटेल असा माझा बाबा मुलांची जबाबदारी पूर्ण करत असतो.किती लिहावे काय काय लिहावे असे होते. पण शब्द च अपुरे पडता या थोर पुरुष समोर.नेहमी फादर डे साजरा करतो.पण त्याच दिवशी का ? रोज आपण आपल्या बाबा चा दिवस साजरा करू शकतो . तुम्हाला आणखी लेख वाच्याचे असतील तर नक्की वाचा मैत्री कशी असते? मैत्री म्हणजे काय ? | What is friendship like? What is friendship?
कसा वाटला लेख तुम्हाला ? नक्कीच आवडेल तुम्हाला. नक्की कमेंट करून सांगा.
धन्यवाद!
Don't spam comment