|आई हि मायेचा सागर | Mother is the ocean of love |

0

आई हि मायेचा सागर


             आपण जेव्हा "आई" हा शब्द बोलतो  तेव्हा त्या शब्दामध्ये किती प्रेम आणि आपुलकी, माया असते. 
आपले जग आई भोवताली असते. आई  ह्या शब्दामध्ये किती ताकद असते. आपण रोज अनुभव घेत असतो.


आई जेव्हा आपल्या ला गर्भात असताना पासून ते मोठे होईपर्यंत किती काळजी घेते.
  आपल्या जराशी ठेच लागली तरी तिचा जिव कासावीस होतो.  ती आपल्या तळहाता प्रमाणे मुलांना जपते. 
तुम्ही चिमणीला बघितले का ? जेव्हा ती खाऊ आणून आपल्या चोचीने आपल्या पिल्लांना खाऊ घालत असते.


तसेच या पृथ्वी वर जेवढे प्राणी आहेत प्रत्येक का मधील आई आपल्या पिलांना, प्राण्यांना ,मुलांना त्रास होणार नाही असे अशी काळजी घेत असते.आणि त्यांचे संगोपन करत असते. 


आपण बाहेरून घरी जा  तो  तेव्हा पहिले आपले डोळे आई ला शोधत असते. आपण किती हि मोठे झाले तरी आपण आपल्या आई साठी लहान असतो. 


आई नसेल कसा दिवस  जातो आपण ते आपण कल्पना करू शकत नाही.  खूप कंटाळवाणा,भकास, उदास पणा असलेला  जातो ना ?  माझा तर  दिवस काही नसल्यासारखे आज आपला दिवस चुकल्यासारखे जाते.


तूमचा पण दिवस असाच जातो का ?  जात असेल  तर पाहा अनुभवून.


      कवि यशवंत म्हणतात ,कि 

"आई म्हणुनी  कोणी आईस हाक मारी
   " स्वामी तिनीजगाचा आईविना  हाक भिकारी"




आई- ती आणि तिचे अस्तिव
|आई हि मायेचा सागर | Mother is the ocean of love |


"आई" असा शब्द आहे कि त्याचा सभोतली  सगळे जन  घुटमळत असते. अगदी लहानापासून ते मोठ्या मुलापर्यंत.


आई हे नाते आपल्या मातीशी जवळीक असते. जशी आई आणि बाळाची नाळ कशी जोडलेली असते तशी भिकारी या शब्दावरून आठवले की,भिकारी हा मराठी सिनेमा आहे.


 त्या सिनेमात आपल्या आईच्या आयुष्यासाठी तो नट भिक मागत असतो कारण त्याची आई ही कोमात गेलेली असते तिला वाचवण्यासाठी तो त्याची सगळी संपत्ती, ऐशआरामात,मस्त पैकी चाललेली त्याची जिंदगी सोडून  तो आपल्या आईच्या सुखासाठी भिक मागत असतो.

 
       आई ची रूपे ही वेगवगळी असतात. कधी आई खूप मायाळू,प्रेमळ खूप काळजी करणारी आणि कधी तर खूप रागवणारी चीड चीड करणारी मारणारी असे आपण बघत असतो.


 ती चा हेतू कधीच वाइट नसतो पण ती जे काही करते आपल्या चांगल्या साठीच करत असते.
ती आपल्याला चांगल्या सवय लावण्याचा प्रयत्न करत असते.पण कितीही रागवली तरी आई थोड्या वेळाने जवळ घेणारी  आणि माया करणारी आई च  असते.


 प्रत्येकाला हवी हवी शी अशी वाटणारी आई खूप लाड करते. आपल्याला काय पाहिजे काय नको आणि काय छान वाटेल अशी सांगणारी आपली आई च असते.


        सगळ्यांचे  लाड पुरवणारी आपल्या आवडीचे खाऊ बनवणारी आणि  प्रत्येकाला आवड निवड जपणारी ही आई च असते.


 प्रत्येकाला आई चे सुख भेटते असे नाही ज्यांना भेटते ते खूप भाग्यवान असतात.
 आणि ज्यांना ते नाही भेटत त्यांना विचारा आई चे प्रेम मिळवण्यासाठी ते किती आसुसलेले असतात. त्यांनाच खरचं आई च्या प्रेमाची किंमत कळत असते.


         जेव्हा मला समजले मी आई होणार आहे या शब्दाने माझे डोळे पाणावले होते.
कारण आई होणे प्रत्येकाचा नशिबात नसते

. मला जे सुख मिळाले त्या साठी मी देवाचे खूप आभारी आहे.
 जेव्हा आपण आई होतो तेव्हाच आई पण काय असते आणि त्याचा आनंद किती आहे ते समजते. 
आणि आई ची खरी किंमत कळत असते. 


आई ने आपल्याला वाढवताना किती त्रास आणि कष्ट केले ते समजते.


 म्हणून आपण आई शी बोलताना तिचे आदर ठेवला पाहिजे. 
        मला एक सांगावेसे वाटते की, मी माझ्या डोळ्यांसमोर एक जिवंत   उदाहरण बघीतले.
मी एकदा गावी गेली होती. दुपारची वेळ होती मी माझे काम आवरणे चालले होते.


अचानक मुलांचा आणि माणसाचा आवाज यायला लागला तो आवाज शेजारचा होता.
 दोन घरे सोडून तिथे एक माकड आले होते. आणि त्याचे पिल्लुला घेऊन ती बसली होती.


 मी पण गेली बघायला, बगते तर  ते पिलू शाक लागून मेले होते.आणि त्या पिलू ला घेऊन बसली होती.
ती आई असावी  त्या पिलुची आणि त्या पिलुला एक टक बघत होती. बहुतेक ते दुःख सहन नसेल झाले त्या आईला  आणि माणसं आजूबाजूला गोळा झाली होती.  


त्या माणसाच्या घोळक्यातून आपल्या पिलू ला घेऊन बाहेर गेली. मला ही खूप दुःख झाले.
 त्या  आईचे  डोळे खूप पाण्याने भरले होते आणि तिची नजर इकडे तिकडे बघत होती.


 आणि तो दिवसभर माझ्या मनात त्या आईचे आणि पिलुचे चित्र डोळ्यासमोर दिसू लागले होते. 
आजही तसेच्या तसेच्या तसे चित्र आठवते. फक्त ती अपल्याप्रमाने बोलू शकत नव्हती.जोरजोरात रडू शकत नव्हती.ती फक्त पीलुला घेऊन न्याहाळत होती आणि बघत होती माणसाना.सर्वा माणसानं पण खुप वाइट वाटले होते.


 एका आईला आपल्या डोळ्यासमोर आपले बाळ गमवावा लागला.तिला किती त्रास झाला असेल ,आपण विचार करू शकत नाही. 


आजही अशी अनेक बालके मारतात किती यातना होत असतील आईला  याचे खूप दुःख  वाटते आहे. 
आज काल खूप प्राणी पक्षी असेच शाक लागून मरत आहेत.त्या वायेर च पण राग आला पण आपण काय करणार ना ? त्या वायर विजेच्या आहेत. 


"आई " बोलताना ना आठवले ते मी शेअर केले 
कसा वाटला लेख तुम्हाला ? नक्की सांगा कॉमेंट करून 
 

         आज आईचा दिवस  आहे, म्हणजे ,आपण सगळे डे कशे साजरा करतो, तसे आपण आईचा दिवस  म्हणुन साजरा करतो .

खर आई चा दिवस हा एक दिवस नाहीत तर रोज साजरा केला पाहिजे. कारण आई हि घरचे मांगल्य असते . आईविना आपला एकही दिवस असा जात  नाही कि, आई हि हाक मारत नाही.आई हे कुटे आहे ग आई ते कुटे आहे  ग असा आपण ओरडत असतो .

 त्या बिचारी आई ला काय काम कमी असत्तात. नवर्याचे लाड  पुरव्याचे, काय ते नको बगायचे, आणि मैन  म्हणजे सगळे हातात  द्याचे असते. 

खूप तारेवरची कसरत असते. मुला ब बाळांचे बाग्यचे सु;ख दु;ख बग्याचे आणि हे सगळे करत असतना तिच्या  शरीराची जी झीज होते ती त्याकडे ती दुर्लक्ष करते. मग तिला नको त्या संकटाना सामोरे जावे लागते.
   
आपण अभ्यासामध्ये किती तरी कविता ऐकल्या आहेत ती म्हणजे   "आईस हक मारी ती हक येई कानी"
"आई हि मायेचा सागर आहे  आई" 


 आई हि आपली पहली गृरू मानली जाते.  जी 


चालायला ,वाचयला, बोलयला, शिकवते. आपले बाळाला जराशी टेच लागली किवा पडला तर तिला खूप  त्रास होतो तिला  ती आपल्या बाळाला तळातापुढे प्रमाणे जपते. जेव्हती आई होण्याचे सुख तिला लाभते तेव्हा तिला खूप आनंद होतो .

 तेव्हापासुन ती खूप काळजी घेत असते ते मोठे होई पर्यंत . ती जगते फक्थ आपल्या पिल्लांसाठी.  आई ची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. जरी मुले मोठे झाली  तरी तिच्यसाठी आपण लहान असतो.

 
त्यामुळे आपण तिला कधी हि न दुखवलेले  बर ! तिची कशी काळजी घेता येईल?  आणि तिला कसे आनंद  ठेवता येईल? याच्याकडे बगीतले पाहिजे.

आपली  आई कशी असली तरी ती आपली आई असते. तिचा ओरडा  किवा ती आपल्यावर रागवली असली तरी तिचा राग निवलतो आणि आपल्या कुशीत घेते , आणि मायेने हात फिरविते आपल्या डोक्यावर खूप भारी वाटेते.

आणि ते  फिलिंग  खूप भारी असते. ती आपल्या घरच्यासाठी खूप राबते तरी पण आपण काय म्हणतो तर, आई कुठे काय करते ? असे आपण नेहमी म्हणत असतो .

 'आई 'देवाची देणगी आहे. हि प्रत्येकाला दिलेली म्हणता येईल. जेव्हा आई आपल्या बाळाला नऊ महिने पोटात वाढवते तेव्हा, तिला किती त्रास सहन करावा लागतो

 हि कल्पना पक्थ ती ला कळते . कोनही तिची जागा घेऊ शकणार नाही.तिच्यामध्ये किती ताकद असते आणि किती सयमी असते .ती सगळ्यांचे ऐकून घेते.कारण तिच्यावर कुटुंबाची जबादारी असते.

कितीवेळा तर मूड ऑफ ओंन होतो ,  तिच्या  शरीराराम्ध्ये किती बदल घडत असतो. ती आपल्या  बाळासाठी काय काय करते.





Tags

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)